अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिक बेपत्ता

16 Mar 2023 14:49:28

Indian Army Cheetah Helicopter
(Image Source : Internet/ Representative)
 
नवी दिल्ली :
अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (cheetah helicopter) कोसळले असल्याचे वृत्त समोर आले आहे. येथील मांडला हिल परिसरात गुरुवारी सकाळी हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकोटरमध्ये दोन वैमानिक उपस्थित असून दुर्घटनेननंतर ते बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले असून लष्कराच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
गुवाहाटी संरक्षणचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ कार्यरत आर्मी एव्हिएशन चित्ता हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी 9:15 च्या सुमारास ATC शी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. यानंतर बोमडिला पश्चिमेकडील मांडलाजवळ चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी शोध मोहीम सुरु करण्यात आले आहे. तसेच या घटनेसंबंधी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
 
Powered By Sangraha 9.0