न्यूझीलँडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; ७.१ तीव्रतेची नोंद

    16-Mar-2023
Total Views |

earthquake hits new zealand
(Image Source : Internet/ Representative)
 
वेलिंग्टन :
न्यूझीलँडमध्ये (new zealand) गुरुवारी जोरदार भूकंप झाल्याचे बातमी समोर आली आहे. न्यूझीलँडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांवर गुरुवारी सकाळी हा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी मोजली गेली आहे.
 
नॅशनल सिनेटर फॉर सिस्मोलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास हा भूकंप झाला. NCS ने या भिकंपाची तीव्रता ६.८ इतकी असल्याचे सांगितले आहे. परंतु, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी होती. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर आत होता. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भूकंपासंबंधी अधिक माहितीचे प्रतीक्षा आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.