कमला नेहरू महाविद्यालय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

    15-Mar-2023
Total Views |

kamala nehru college
 
नागपूर:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन महिला सॉफ्टबॉल स्पर्धा नुकत्याच शिवाजी सायंस महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडल्या. या स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाच्या महिला संघाने सिंधू महाविद्यालयावर अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले. या सामन्यामध्ये सिंधू महाविद्यालयावर 2 होम रन विरूध्द 8 होम रन काढून विजय प्राप्त केला. तसेच सेमीफायनलमध्ये शिवाजी महाविद्यालयावर 7 रन विरूध्द 3 रन असा विजय मिळवला तर क्वार्टर फायनलमध्ये अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयावर 6 रन विरुध्द 2 रन अशा फरकाने सामना जिंकला.
 
कमला नेहरू महाविद्यालयातील महिला खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम स्थान पटकावले. या संघात कांचन तायवाडे, मयूरी तिनखेडे, स्नेहा चौधरी, सृष्टी डांगरे, ऋतुजा वाघमारे, सुहानी जिभकाटे, प्रणाली शेंडे, छाया गौर, उर्वशी शनेश्वर, सारा टेंभुर्णे, लक्ष्मी पुसे, साक्षी निस्ताने, पूजा क्षिरसागर, समिक्षा चामट या सर्व खेळाडूंचा समावेश होता.
या सर्व खेळाडूंचे अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, सचिव तथा पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी व कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक आणि क्रीडा शिक्षक डॉ. चेतन महाडिक यांनी विजयी महिला संघाचे अभिनंदन करून हार्दीक शुभेच्छा दिल्या.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.