नागपुरातील वॉकर्स स्ट्रीटवरील 'वॉकर्स पॅराडाईज'ची झलक

    15-Mar-2023
Total Views |
'Walkers Paradise' at Walkers Street :

Walkers Paradise

नागपूर :
यंदा भारताला G20 परिषदेत अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे भारतासह देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अभिमानाची बाब आहे. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. G20 बैठक होऊ घातलेल्या शहरांमध्ये सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे.

Walkers Paradise

अशातच नागपूर शहरात G20 परिषदेतर्गत नागरीसंस्थाची C20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्यामुळे C20 परिषद डोळ्यासमोर ठेवून नागपूर शहराचे सुशोभीकरण करण्यात येत असून त्यात शहरातील 'वॉकर्स स्ट्रीट' चा देखील समावेश आहे.

Walkers Paradise 
 
सिव्हिल लाईन्स परिसरातील वॉकर्स स्ट्रीटवर चालणाऱ्या नागरिकांचे विविध पुतळे साकारण्यात आले आहेत. हे सर्व पुतळे वॉकर्स ट्रीटवर चालणाऱ्या लोकांचे विविध भाव दर्शवणारे आहेत.

Walkers Paradise 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच या 'वॉकर्स पॅराडाईज' (walkers paradise) चे उद्घाटन करण्यात आले. या 'वॉकर्स पॅराडाईज' अंतर्गत येथे ११ पुतळे बसवण्यात आले आहेत.

Walkers Paradise 

'वॉकर पॅराडाईज' अंतर्गत साकारण्यात आलेल्या ११ पुतळ्यांमध्ये स्वस्थ राहण्यासाठी नियमित फिरायला येणारी महिला, काठीच्या सहाय्याने फिरणारे ज्येष्ठ व्यक्ती, आपला बाळाला फिरवणारी आई, श्वानाला फिरवणारे व्यक्ती, आताची तरुणी, तरुणांचा ग्रुप, सहजच फेरफटका मारणारे लोक यांसारखे भाव बघायला मिळत आहे.
 
Walkers Paradise 
 
ग्रीन फाउंडेशनने हे पुतळे साकारण्याची संकल्पना मांडली होती.

Walkers Paradise 
 
--------------------------------------------------------

Walkers Paradise 
 
 --------------------------------------------------------
 
Walkers Paradise
 
 --------------------------------------------------------
 
Walkers Paradise 
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.