ऑस्कर प्राप्ती हा जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा - उपराष्ट्रपती

    14-Mar-2023
Total Views |

- 'नाटू नाटू' आणि 'द एलिफंट व्हिस्परर' च्या चमूचे राज्यसभेत अभिनंदन

Indian Oscar winners(Image Source : Instagram) 
 
नवी दिल्ली :
ऑस्करमधील (Oscar) यश हे जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा आणि मान्यता याचाच आणखी एक पैलू आहे, असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले. धनखड यांनी आज राज्यसभेत 'नाटू नाटू' या गाण्याचा समावेश असलेल्या आर आर आर चित्रपट आणि 'द एलिफंट व्हिस्परर' या माहितीपटाच्या चमूचे प्रतिष्ठित अशा 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले.
ऑस्करमधील (Oscar) यश हे जागतिक स्तरावरचा भारताचा वाढता दबदबा आणि मान्यता याचाच आणखी एक पैलू आहे. या यशातून भारतीय कलाकारांच्या अलौकिक प्रतिभा, अफाट सर्जनशीलता आणि निष्ठा यांना मिळालेली जागतिक प्रशंसा दर्शवते, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी म्हणाले. हे ऑस्कर विजेते भारताने निर्माण केलेल्या सिनेमाच्या संपूर्ण युगाची नवी ओळख दर्शवतात, असे उपराष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सभागृहाला संबोधित करताना अधोरेखित केले.
 
या (Oscar) यशामुळे भारतीय चित्रपट उद्योग मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. राज्यसभेतल्या या त्यांच्या अभिनंदन संदेशाच्या एक दिवस आधी, उपराष्ट्रपतींनी 'द एलिफंट व्हिस्परर' मध्ये निसर्गाशी असलेले आपले साहचर्य सुंदर प्रतिबिंबित केल्याबद्दल प्रशंसा केली होती आणि 'नाटू नाटू' हे गाणे भारताच्या गतिशीलतेचे आणि उर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.