NEET PG 2023 Result: नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर

14 Mar 2023 20:34:35

NEET PG 2023 Result
(Image Source : Internet/ Representative)
 
नवी दिल्ली :
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी (NEET PG 2023) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रदीर्घ प्रतिक्षेला आज पूर्णविराम दिला आहे. NBEMS आज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. NBEMS ने NEET-PG परीक्षा (NEET PG 2023) यशस्वीपणे आयोजित करून आणि विक्रमी वेळेत निकाल जाहीर करून पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.
 
यावर्षी सुमारे २.९ लाख विद्यार्थ्यांनी NEET PG परीक्षेला (NEET PG 2023) बसण्यासाठी नोंदणी केली होती. २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी NEET-PG २०२३ ही परीक्षा MD/MS/DNB/डिप्लोमा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.
 
यावर्षी सुमारे 2.9 लाख विद्यार्थ्यांनी NEET PG परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली होती. NEET-PG 2023 ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात या MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5 मार्च 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
येथे पाहता येणार निकाल
१. https://natboard.edu.in/
२. https://nbe.edu.in
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0