कसोटी सामन्यात विराट कोहलीचा जोरदार कमबॅक! तीन वर्षांनंतर झळकावले शतक

    12-Mar-2023
Total Views |

virat kohli
 (Image Source : tw/@BCCI)
 
अहमदाबाद :
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत (ind vs aus) कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार कमबॅक केला आहे. विराटने तब्बल साडेतीन वर्षानंतर कसोटी सामन्यात शतक झळकावला आहे. 241 चेंडूंचा सामना करत त्याने हा शतक पूर्ण केला.
 
अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया (ind vs aus) कसोटी सामन्यात विराटने आपल्या कारकिर्दीतील 28 वी सेंचुरी ठोकली. त्याची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वी सेंचुरी आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला. यापूर्वी 2012 मध्ये नागपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सामन्यात कोहलीचा सर्वात संथ शतक झाला होता. त्या सामन्यात त्याने 289 चेंडूंमध्ये आपला शतक पूर्ण केला होता.
 
विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील मागील शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक करता आले नाही. आता त्यानी हा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीने 23 सामने आणि 41 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.