Mahashivratri 2023: आज महाशिवरात्री; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी

    18-Feb-2023
Total Views |
 
mahashivratri 2023
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
संपूर्ण भारत देशात आज म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा (mahashivratri 2023) उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान महादेवाचे दर्शन करण्यासाठी शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी पाहायला मिळत आहे. भगवान शंकराची पूजा करून भाविक त्यांचा आशीर्वाद घेतात.
 
हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा (mahashivratri 2023) उत्सव साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्रीला विशेष योगायोग घडत आहेत. यंदा सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, जो 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.12 पासून सुरू होईल आणि 6.03 पर्यंत सुरु राहील. या मुहूर्तावर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. शिवपुराणानुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान शंकर वास करतात, असेही म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर आहे आज आपण पूजेचा शुभ मुहूर्त आणि शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेणार आहोत.
 
पूजा करण्याची विशेष पद्धत
महाशिवरात्रीच्या (mahashivratri 2023) दिवशी पूजा करण्याची विशेष पद्धत आहे. या पद्धतीनुसार पूजा केल्याने महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. पूजा करण्यापूर्वी सकाळी उठून प्रथम घराची व्यवस्थित स्वच्छता करावी. नंतर स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक, दुधाभिषेक करावा. जलाभिषेकासाठी गंगेच्या पाण्याची प्रार्थना करा. यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, फुले, भांग इत्यादी अर्पण करा. यानंतर नैवेद्य चढवा. नैवेद्यामध्ये नारळ वापर नक्की करा. यानंतर जल अर्पण करा. यानंतर शिव चालीसा, महामृत्युंजय मंत्र, शिवस्त्रोत जप करून आरती करून पूजा समाप्त करा.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.