ISRO : SSLV-D2 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

    10-Feb-2023
Total Views |

SSLV D2
(Image Source : tw/@isro)
 
श्रीहरिकोटा :
अंतराळ क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी कामगिरी (isro launches sslv d2) केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने नवीन आणि सर्वात छोटे रॉकेट SSLV-D2 (Small Sataellite Launch Vehicle) चे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या लॉन्च पॅडवरून SSLV-D2 (Small Sataellite Launch Vehicle) शुक्रवारी सकाळी 9.18 वाजता प्रक्षेपित (isro launches sslv d2) करण्यात आले. इस्रोने तीन उपग्रह EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 अंतराळ कक्षेत ठेवण्याची योजना आखली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, SSLV-D2 ने या तिन्ही उपग्रहांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत यशस्वीरित्या ठेवले आहे. या यशाबद्दल इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी टीमचे अभिनंदन केले.
एस सोमनाथ म्हणाले, जेव्हा SSLV-D1 दरम्यान समस्या आल्या तेव्हा आम्ही त्यांचे विश्लेषण केले आणि आवश्यक पावले उचलली आणि यावेळी प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे सुनिश्चित केले. (isro launches sslv d2)
 
SSLV-D2 ने तीन उपग्रह घेऊन अवकाशात झेप (isro launches sslv d2) घेतली. यावेळी यात अमेरिकन कंपनी अँटारिसचा Janus-1, चेन्नईस्थित स्पेस स्टार्टअप SpaceKidz चा AzaadiSAT-2 आणि इस्रोचा उपग्रह EOS-07 यांचा समावेश आहे. यानंतर SSLV-D2 हे तिन्ही उपग्रह 450 किलोमीटर अंतरावर वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरीत्या ठेवले. 
 
इस्रोने ने SSLV-D2 च्या वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे रॉकेट 'लाँच ऑन डिमांड' या तत्त्वावर काम करेल. हे रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 500 किलो वजनाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण पूर्ण करेल. SSLV-D2 रॉकेटचे वजन 120 टन असून ते 34 मीटर उंच आहे. (isro launches sslv d2)
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.