वाडीत जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

    09-Dec-2023
Total Views |
  • आ. समीर मेघे यांची संकल्पना
virangula-kendra-godamnagari-vadi - Abhijeet Bharat
 
वाडी : गोदामनगरी वाडी शहराची लोकसंख्या एक लाखाच्या वर आहे. वसाहती व बाजारपेठही महामार्गावरच असल्याने परिसरातील जनजीवन तसे धावपळीचे व अधिक रहदारीचे आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांना आपला निवांत वेळ घालविण्यासाठी कुठेतरी चौकात बसावे लागत होते. म्हणून नगरपरिषद वाडी परिसरातील जेष्ठ नागरिकांकरिता मनोरंजनाचे साधन म्हणून आमदार समीर मेघे यांच्या संकल्पनेतून विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
 
कला, साहित्य, स्वच्छता, पर्यावरण व संगीत प्रेमी म्हणून ओळख असलेले वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्थापना करण्यात आली. नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयात हे विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले असून त्यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या मनोरंजनाकरिता कॅरम, चेस, ताश पत्ते, थोर पुढारी, विचारवंत, विद्वान साहित्यिकांचे लेखन साहित्य, आत्मचरित्राची पुस्तके, वृत्तपत्र टीव्ही आदी मनोरंजनाचे साहित्य ठेवले आहेत.सोबतच लाईट, पंखे, पिण्याचे पाणी, बाथरूम शौचालय, कुलर व इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
एका छोटेखानी वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना वाडीतील सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी या विरंगुळा केंद्राचा लाभ घेऊन आपापल्या कला गुणांना वाव देऊन ती जोपासण्याचे आवाहन केले. संचालन जेष्ठ लिपिक योगेश जहागीरदार यांनी केले. यावेळी विजय गंथाडे, उपमुख्याधिकारी गौरव गाडगे, नितेश घोरमाडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे, नंदन गेडाम, प्राची लांजेवार, अतुल सरदार, अमोल सोनसरे, पल्लवी हुमणे, सुषमा भालेकर, सतीश जाधव, मुकेश महोतो, माधवी भिलावेकर, योगेश जहागीरदार, मनोहर वानखेडे, भारत ढोके, कमलेश तिजारे, भीमराव जासुतकर, अशोक जाधव, रमेश कोकाटे, गणेश कोहळे, विलास झाडे, अंकीता रेंदे, शिला कांबळी, अंकीता, ठाकरे, सरिता गजभिये, धनंजय कलसे,लकी सोनकर, वैभव कुरडकर, इंद्रजित इरपाची, शंकर पंचबुद्दे, तृषार पातूरकर, कंत्राटी कर्मचारी, सफाई कामगार उपस्थित होते.