हिवरखेड येथे जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली

09 Dec 2023 15:08:28

global-aids-awareness-rally-hivar-khed - Abhijeet Bharat
 
हिवरखेड : येथील सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कार्यात अग्रेसर कमल फाऊंडेशन व बिगीनर इंग्लिश स्कुल, ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
 
या रॅलीच्या माध्यमाने हिवरखेडमधील नागरिकांना एड्स विषयक गैरसमज व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत गांभीर्य लक्षात आणुन दिले. या करीता पोस्टर, व्हिडीओ, गाणे तसेच पथनाट्य, कविता तसेच भाषणातून या विषयाबाबत अवगत करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरविंद आमले. बिगिनर इंग्लिश स्कुल ॲड. ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्या वैशाली आमले. मुख्याध्यापिका कल्पना महल्ले यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
Powered By Sangraha 9.0