अमरावती : हमालपुरा येथील चांडक टॉवरच्या पिल्लरला तडे गेल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन पुन्हा जागे झाले. महापालिकेकडून शहरातील जिर्ण इमारतींना वारंवार नोटीस बजावली आहे. परंतू इमारत मालकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. आता पुन्हा मनपा क्षेत्रातील 23 अतिशिकस्त इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी या इमारत मालकांची नावे सुध्दा मनपा प्रशासनाने जाहिर केले आहे.
यापैकी बहुतेक इमारती 60 ते 70 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. अशा घर मालकांना किंवा भोंगवटदारांना 246 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र मनपाला सादर करायचे आहे. नोंदणीकृत अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करून, ती इमारत राहण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करून देण्यात यावे, असे मनपाने स्पष्ट केले आहे.