- डॉ. मनोहर आंडे यांनी दिली विविध योजनेची माहिती
मोर्शी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प रथयात्रा उद्घाटन सोहळा ग्रामपंचायत डोमक येथे थाटात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. मनोहर आंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आंडे यांनी जमलेल्या जनसमुदायाशी सवांद साधून त्यांना केंद्र सरकारारच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डोमक येथील उपसरपंच उमेश कोंडे, भाजपा तालुका अध्यक्ष निलेश शिरभाते, भाजपाचे अनुसूचित जाती मार्चाचे महामंत्री रुपेश ढोले, किसान मोर्चाचे सरचिटणीस अशोक ठाकरे, हरीश वैराळे, अनुसूचित जाती मोर्चाचे मोर्शी तालुकाध्यक्ष अजय लोटे, अंबाडा येथील शक्ती केंद्रप्रमुख अभिजीत कविटकर व कृषी अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी डोमक येथील रोशन वानखडे, श्याम कोंडे, अतुल कोंडे, प्रभुदास कोरे, शुभम कोंडे, रनजीत कोंडे, प्रदीप कोरे यांच्यासह सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.