मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिमाण; चेन्नई विमानतळ पाण्यात बुडाले व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

05 Dec 2023 12:14:24
 
chennai-airport-flooded-michong-cyclone-video-viral - Abhijeet Bharat
 
चेन्नई : बंगालच्या उपसागरातून उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्गमुळे चेन्नईत मुसळधार पाऊस पडत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले असून, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाण्यात बुडाले आहे. पाण्यात बुडालेल्या विमानतळाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडिया वर चांगलेच व्हायरल होत आहेत.
 
मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचले असून सकाळची विमानसेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली. सोमवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे चेन्नई सह राज्यातील इतर शहरे आणि आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीलातील काही भाग पाण्याखाली बुडाला आहे. अनेक ठिकाणी तिथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
चेन्नई शहरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचले. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत.
 
१४४ रेल्वेगाड्या रद्द चक्रीवादळाच्या पृष्ठभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सतत संपर्कात असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने १४४ गाड्या रद्द केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0