नियमितपणे नारळ पाणी पिल्याने शरीराला होतील 'हे' फायदे

    05-Dec-2023
Total Views |
benefits of drinking coconut water (image source: internet)
नागपूर :
रुग्णालयात अनेकदा आजारी व्यक्तीसाठी नातेवाईक भेटायला जाताना (शहाळे) नारळ पाणी नेतात. इतकेच नाही तर डॉक्टर देखील रुग्णाला बऱ्याचदा (शहाळे) नारळपाणी पिण्यास सांगतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे, शहाळ्यात असलेली पोषक तत्वे. नैसर्गिकरित्या गोड आणि हायड्रेटिंग गुणतत्व असण्याबरोबरच भरपूर प्रमाणात नैसर्गिक पोषक तत्वांचा आणि खनिजांचा स्त्रोत नारळ पाण्यात आहे. नारळ उष्णकटिबंधीय हवामानात तयार होणारे एक फळ आहे. नारळाचे पाणी हे कोवळ्या, हिरव्या शहाळ्यात आढळते. आयुर्वेदात शहाळ्याला पचन आणि शरीरात त्वरित ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करणारे फळ मानले जाते. हल्ली नारळ पाणी हे एक ट्रेंडी पेय देखील बनले आहे. नियमितपणे नारळ पाणी पिल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. हेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
 
नियमितपणे नारळ पाणी (शहाळे) पिण्याचे फायदे
 
१. ऊर्जा वाढण्याचे सर्वोत्तम स्रोत:
वर्कआऊट करताना आणि वर्कआऊटनंतर पिण्यासाठी नारळपाणी हे एक उत्तम पेय आहे. नारळाचे पाणी हे खनिजे, इलेक्ट्रोलाईट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असल्याने शरीरातील ऊर्जा पातळी त्वरित वाढवण्यास मदत करते. व्यायामादरम्यान थकवा आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी उपयोगी असणारे हे पेय आहे.
 
२. मधुमेह व्यवस्थापनात मदत करते:
एका संशोधनानुसार, नारळ पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि मधुमेहाची लक्षणे दूर करण्यात देखील मदत करते. मॅग्निजचा चांगला स्रोत असल्याने शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास नारळ पाणी हे एक चांगले नैसर्गिक उपाय ठरते.
 
३. हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवण्यात मंद करते:
नियमितस्वरूपात नारळ पाण्याचे सेवन केल्याने हृदयविकार टाळण्यास फायदेशीर ठरते. नारळ पाण्यात पोटॅशियम अधिक प्रमाणात असते. यामुळे हृदयरोगाचे मुख्य कारण असणारे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. हे हृदयाचे आरोग्य सुदृढ करण्यास देखील फायदेशीर ठरते. तसेच रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास देखील उपयोगी ठरते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
 
४. शरीराला डिटॉक्स करण्यास उपयुक्त:
खनिजे, इलेक्ट्रोलाईट्स आणि अँटी ऑक्सिडंट्सचे गुणतत्व असल्यामुळे नारळाचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी एक उत्तम स्त्रोत आहे. शरीराला अँटी ऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन मिळाले की शरीर सहजपणे डिटॉक्सिफाय होऊन जाते. यातील आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या इतर पदार्थांच्या मदतीने त्वचा निरोगी दिसण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्याने शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजन संश्लेषण उत्तेजित (NATURALLY STIMULATE COLLAGEN SYNTHESIS) होते.
 
५. किडनी स्टोन टाळण्यासाठी उपयुक्त:
किडनी स्टोनच्या रुग्णांना जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशात आपल्या आहारात नारळाच्या पाण्याचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. नियमितस्वरूपात नारळाचे पाणी पिल्याने किडनी स्टोन टाळण्यास मदत होऊ शकते.