माधान येथे गुलाबराव महाराज हरिनाम सप्ताह

    03-Dec-2023
Total Views |
  • ३ ते ११ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन
madhaan-gulabrao-maharaj-hari-naam-saptah-2023 - Abhijeet Bharat
 
चांदूर बाजार : तालुक्यातील श्री क्षेत्र माधान येथे ३ ते ११ डिसेंबर दरम्यान ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. या उत्साहादरम्यान श्री संत गुलाबराव महाराज संस्थानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
यावर्षी 'श्री' चा १४२ वा स्मृति महोत्सव विविध धार्मीक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाद्वारे साजरा होणार आहे. आज ३ डिसेंबरला रामप्रहरी तिर्थस्थापना, पादुका पुजन, काकड आरती हरिभक्तपारायण कैलास महाराज कराळे व गौरव ज्ञानेश्वरराव मोहोड यांच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहातील पहिले भोजन माधान येथील गोरले कुटुंबियाकडून दिल्या जाते. ही परंपरा गोरले कुटुंबियांनी तीन पिढ्यापासून सुरु ठेवली असून आजही कायम आहे. सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमामध्ये सकाळी रामधून व बौध्दिक, त्यानंतर ८ ते ९ वाजेदरम्यान भक्तपदतिर्थामृत परायण होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तृप्ती खोडे व लक्ष्मी मोहोड करणार आहेत.
 
दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान श्रीमद्भागवत कथेचे पठन भागवताचार्य श्री भगिरथ महाराज काळे (नाशिक) करणार आहेत. सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान ज्ञानेशकन्या हरिपाठ मंडळा कडून हरिपाठाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे संयोजक जीवन महाराज मोहोड आहेत. सप्ताहा दरम्यान रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये हरिभक्तपरायण डॉ.अरविंद महाराज देशमुख, पंकज महाराज पवार, अक्षय महाराज बोरडे, भगिरथ महाराज काळे (नाशिक), पंकज महाराज पोहोकार, शिवेंद्र महाराज काळे, रमेश महाराज दुधे यांचा हरिकिर्तनाचा कार्यक्रम होईल. १० डिसेंबरला दुपारी १ वाजता उपस्थित सर्व हरिभक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. त्याच दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पंचक्रोशीतील भजन मंडळी सहभागी होणार आहे. ११ डिसेंबरला रामप्रहरी श्री शोभायात्रा काढण्यात येईल. त्यानउपलब्धतर दहीहांडी कार्यक्रम होईल. त्यानंतर अहवाल वाचन करण्यात येईल.