दिव्यांगासाठी ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’; असा करा अर्ज

29 Dec 2023 12:44:34
 
divyang-employment-ev-mobile-shop - Abhijeet Bharat
 
नागपूर : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना शासनाने लागू केली आहे.
 
या योजनेच्या अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या स्तरावरुन सुरु आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे,दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक,सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा योजनेचा उद्देश आहे.
 
इथे करा अर्ज...
 
योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल 3 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0