- सचिन पिळगावकर व वैभव जोशी यांचा सहभाग
नागपूर :
लष्करामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, प्रभावी वक्ते, कथाकथनकार, कवी, ‘आईना-ए-गझल’ कार डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी वाईकर परिवार व सप्तक, नागपूरच्यावतीने विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी, ‘मुशायरा- आईना-ए-गझल’ हा गझलांचा कार्यक्रम शनिवार, 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्टंट सिस्टीम्स, गायत्री नगर येथे होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक, अभिनेते, गझलकार सचिन पिळगावकर व कवी, गीतकार वैभव जोशी यांचा सहभाग राहील. सोबतच, क्रांती साडेकर ‘रुह’, सुधीर बल्लेवार ‘मलंग’, एजाज शेख व दीपक मोहळे हे गझलकारदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत नांदूरकर ‘खलिश’ करणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्क असून केवळ सप्तक सभासद व निमंत्रितांसाठीच आहेत, असे वाईकर परिवार व सप्तक तर्फे कळवण्यात आले आहे.