गुरुमंदिरात मंगळवारी पालखी सोहळा

    25-Dec-2023
Total Views |
-धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
 
palki ceremony in shrigurumandir
नागपूर:
जयप्रकाश येथील गुरुमंदिरात मंगळवार, 26 डिसेंबर रोजी, सकाळी 6 वाजता दत्त जयंती निमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार २६ व बुधवार, २७ डिसेंबर रोजी सद्गुरुदास महाराज यांच्या उपस्थितीत दत्तजयंतीचा मोठा उत्सव होणार आहे. या द्विदिवसीय कार्यक्रमात मंगळवारी टाळ, मृदंग, टिपर्‍या, भजने अशा मंगल वातावरणात, सकाळी दत्ताची पालखी नगरप्रदक्षिणेकरिता निघणार आहे.
 
गुरुमंदिरातून निघणारी ही पालखी खासने गल्लीतून चतुरकरांच्या बाजूने गोविंदनगर, रमेश दलाल यांच्या घरासमोरून एस. बी.आय. च्या बाजूने तपोवन डावी गल्ली तून गजानन महाराज मंदिर, डावीकडे वळून डॉ. डांगरे यांच्या घरासमोरून उजवीकडे महालक्ष्मी मंदिर, बरबरवार यांच्या घरासमोरून श्रीराम मंदिर व तेथून परत गुरुमंदिरात येईल. यानंतर 7 वाजता पंचसूक्त पवमान अभिषेक व रूद्राभिषेक, 11.30 वाजता दत्तजन्म सोहळा व दर्शन, सायंकाळी ५:३० वाजता बाल कीर्तनकार अनय प्रतिक विंचुरे ह्याचे दत्त जन्मावर कीर्तन होईल.
 
सोहळ्याचे मुख्य आकर्षण सायंकाळी 7 वाजता सद्गुरुदास महाराज यांचे समारोपीय अभंग निरुपण होणार आहे. बुधवार, 27 रोजी सकाळी 9 वाजता अमरावतीचे सोपान गोडबोले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. गोपाल काला वाटपा नंतर दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ह्या दोन्ही दिवस मंगल प्रसंगी भाविकांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्रीगुरू मंदिर परिवारानी केली आहे.