जाणून घ्या; मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना

23 Dec 2023 14:13:03

matang-community-educational-loan-scheme-higher-education - Abhijeet Bharat 
नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यात देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 30 लाख रुपये तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी 40 लाख रुपये इतके शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर येथील जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. व्ही. राचर्लावार यांनी केले आहे.
 
शैक्षणिक कर्ज व्याज दर व परतफेड
 
देशातंर्गत शैक्षणिक कर्जासाठी व्याज दर महिला लाभार्थीसाठी 5.5 टक्के व पुरुष लाभार्थी साठी 6 टक्के व्याज दर आहे विदेशात शिक्षण घेण्यासाठी महिला लाभार्थीसाठी 6.5 टक्के व पुरुष लामार्थीसाठी 7 टक्के व्याज दर आहे. 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज परत फेडीचा कालावधी 10 वर्षाचा व 10 लाख रुपयापेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा असेल कर्ज परतफेडीची सुरवात शिक्षण पूर्ण होवून 6 महीन्यांनतर किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेव्हा पासून सुरवात होईल.
 
कर्ज योजना लागू असलेले अभ्यासक्रम
 
अभियांत्रिकी (डिप्लोमा, बीटेक, बी.ई.एम.टेक. एम.ई.), आर्किटेक्चर (बी.ई. आर्किटेक्चर, एम. आर्किटेक्चर), मेडीकल (एमबीबीएस, एम.डी, एमएस), बायोटेक्नालॉजी, मायक्रोलॉजी, क्लीनिकल (डिप्लोमा, डिग्री), फार्मसी (बीफार्मसी, एमफार्मसी), डेन्टल (बीडीएस, एम.डीएस), फिजीयोथेरपी (बीएससी, एमएससी), पैथालाजी (बीएससी, एमएससी), नर्सिंग (बीएससी, एमएससी), माहिती तंत्रज्ञान (बीसीए, एमसीए), व्यवस्थापन (बीबीए, एमबीए), हॉटेल व्यवस्थापन व कॅटरींग, तंत्रज्ञान (डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर), विधी (एलएलबी, एलएलएम), शिक्षण (सीटी, एनटीटी, बीएड, एमएड), शारीरीक शिक्षण, पत्रकारीता अभ्यासक्रमासाठी ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
 
सोबत जोडावयाचे कागदपत्रे
 
जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, शैक्षणिक दाखले, ज्या कॉलेज, विद्यापीठात शिक्षण घेत आहात त्याबाबतचा पुरावा, बोनाफाईड सर्टीफिकेट, कॉलेज, विद्यापीठाची वर्षनिहाय शुल्काबाबत पुरावा, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो अर्जासोबत जोडावे.
Powered By Sangraha 9.0