कोल्हापूर विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना सोबत प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना संभावित धोक्याबाबत दिले गेले मार्गदर्शन

    21-Dec-2023
Total Views |
 
kolhapur-university-conducts-mock-drill-for-student-safety-and-disaster-management-training - Abhijeet Bharat
 
कोल्हापूर : अलीकडील काळात भूकंप, चक्रीवादळं, पूर, भूस्खलन आणि आग लागण्याच्या घटना देशभरात वारंवार होत आहे. सदर आपत्तीच्या काळात शाळांच्या इमारतीसारख्या पायाभूत सुविधांचे पडझड किंवा गंभीर नुकसान यामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रक्रियेत व्यत्यय येत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच शाळेचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा, पाचगाव ता. करवीर जिल्हा. कोल्हापूर आश्रमशाळेत आपत्ती जागरूकता आणि जोखीम कमी करण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गुरुवार (दिं. 19 ऑक्टोबर) अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस नागपूरचे प्रशिक्षक संयोगिता पवार, श्रेयश कोरवी आणि पांडुरंग लोखंडे यांच्याकडून देण्यात आले.
 
शालेय परिसरातील संभाव्य धोके लक्ष्यात घेऊन तसेच नैसर्गिक आपत्तीची माहिती देऊन सुरक्षा मार्गदर्शक अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून भविष्यात शालेय प्रशासन नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकतील. तसेच आश्रमशाळेतील मुलांच्या सुरक्षेबाबत 'मॉक ड्रिल ' घेण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना रस्त्यांवर होणारे अपघात, आग, सर्पदंश तसेच इतर धोक्यांबाबत माहिती देऊन त्यावेळी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेत किंवा शाळेच्या परिसरात आग लागल्यावर मुलांनी कसे सतर्क राहावे, स्वतःचे व सहकाऱ्यांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली. अवधेश असेसमेंट सर्विसेस नागपूर द्वारे विद्यार्थी आणि शालेय प्रशासनासाठी 'मॉक ड्रिल' आयोजित केली होती. यावेळी मुख्याध्यापक श्री संदेश पाटील, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.