Winter Care Tips | थंडीपासून शरीराचे रक्षण करेल मोहरीचे तेल

20 Dec 2023 18:08:32
 
winter care tips benefits of mustard oil
 (image source:internet/representative)
 
नागपूर:
हिवाळ्याच्या दिवसांत शरीराबरोबरच, त्वचा आणि केसांची देखील काळजी घेणे आवश्यक असते. यात मोहरीचे तेल अत्यंत उपयुक्त ठरू शकते. फार पूर्वीपासूनच लहानमुलांची मालिश करण्यासाठी मोहरीच्या तेलाचे उपयोग केले जात आहे. मोहरीच्या तेलाचे भरपूर फायदे आहेत ज्यामुळे आताही लोक याचा उपयोग करतात. पूर्वीच्या काळी स्वयंपाकात मोहरीच्या तेलाचे वापर करण्याची प्रथा होती. बदलत्या जीवनशैलीमुळे, आता ऑलिव्ह ऑइल आणि रिफाईंड ऑईलने वापर केले जाते. मोहरीच्या तेलाचे फायदे जाणून घेतल्यानंतर मात्र तुम्ही देखील याचा वापर करायला सुरुवात कराल.
 
winter care tips benefits of mustard oil
(image source:internet/representative) 
पोषक तत्वनाचा भांडार आहे मोहरीचे तेल:
मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी ऍसिड, ओमेगा ६ फॅटी ऍसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन-ई, यांसारखी पोषक तत्वे आहेत. या पोषक तत्वांच्या मदतीने शरीरातील जमा झालेला खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते.
 

winter care tips benefits of mustard oil
 (image source:internet/representative)
शरीरदुखीत फायदेशीर:
हिवाळ्यात शरीरात जाणवणे साहजिकच आहे. सांधे दुखतात, हात-पाय दुखतात. अशात, मोहरीचे तेल हाके गरम करून मसाज केल्याने रक्तभिसरणात सुधार होते. ज्यामुळे, शरीरातील दुखणे कमी होते.
 

winter care tips benefits of mustard oil
 (image source:internet/representative)
सर्दी- खोकल्यापासून मिळेल सुटकारा:
सर्दी-खोकला हिवाळ्याच्या दिवसांत अगदी सामान्य असते. विशेषतः लहान मुलांमध्ये कफची समस्या जास्त उद्भवते. अशात, छातीवर मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने जमा झालेल्या कफापासून आराम मिळते. सर्दीमुळे नाक बंद होऊन जाते. पाण्यात मोहरीचे तेल टाकून वाफारा घेतल्याने हे त्रास कमी होऊ शकते.
 
 
winter care tips benefits of mustard oil
(image source:internet/representative) 
सूज कमी करण्यास मददगार:
हिवलीयत शरीराला थंड हवा लागल्याने बऱ्याच लोकांना शरीरावर सूजची समस्या उद्भवते. विशेषतः हात आणि पाय जास्त सुजतात. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते.
 

winter care tips benefits of mustard oil  (image source:internet/representative)
त्वचेतील कोरडेपणा करते दूर:
थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना त्वचेत कोरडेपणा जाणवतो. अंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चराइजर लावण्याऐवजी मोहरीचे तेल लावून बघा. त्वचेतील कोरडेपणा दूर करून शरीराला उबदार ठेवण्यात देखील मदत मिळेल. तळव्यावर आणि टाचांवर मोहरीचे कोमट तेल लावल्याने देखील शरीराला उबदार ठेवण्यात भरपूर मदत होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0