श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव साजरा; तेली समाज पंचमंडळाचे आयोजन

    20-Dec-2023
Total Views |
 
sant-santaji-jagnade-maharaj-jayanti-celebration-teli-community-surji - Abhijeet Bharat
 
अंजनगाव सुर्जी : येथील श्रीसंत संताजी जगनाडे महाराज स्व. बाबाराव वा. देवगीरे सांस्कृतीक भवनामध्ये तेली समाज पंचमंडळ अंजनगाव सुर्जीच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता देवनाथ मठ सुर्जी येथुन पालखीला सुरुवात झाली. पालखी सोहळ्यामध्ये अंजनगाव सुर्जी व परिसरातील सर्व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आचार्य जितेंद्रनाथ महाराज (श्रीनाथ पीठाधीश्वर, श्रीदेवनाथ मठ सुर्जी अंजनगाव) यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. संपूर्ण गावामधुन दिंडी पताका व भजन मंडळाच्या सोबतीने वाजत-गाजत अतिशय उत्साहाने देवनाथ मठ, पाचपावली, गुलजारपुरा, पानअटाई, शनिवारा मार्गे तेलीपुऱ्यात आली. श्री संत संताजी जगनाडे महाराज न.प.प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी पालखीचे पुजन केले. तेलीपुऱ्यामधील मुख्य चौकामध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज चौक या फलकाचे अनावरण करण्यात आले. व नंतर सावकारपुरा, काठीपुरा, बालाजी नगर, दर्यापूर मार्ग असा प्रवास करुन शेवटी पालखी देवगीरे नगर येथे पोहचली.
 
जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैभव लेंधे (माजी न.प.उपाध्यक्ष)हे होते तर प्रमुख अतिथी प्रांजली प्रमोदराव अवचार, (पोलीस उपनिरीक्षक नागपूर), प्रा. निकीता उमक, प्रा. मंगेश सुधाकरराव बोरखडे, डॉ. सुरेशराव फाटे, डॉ. मेघा नालट, मोतीराम पोंदे, ह.भ.प. रविंद्रजी फाटे, मुन्ना इसोकार, महेंद्र दिपटे, कृष्णा गोमाशे (माजी शिक्षण सभापती) हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथींचा सत्कार प.पू. सद्गुरु आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. अतिथींनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.