नमो महारोजगार मेळावा: बेरोजगार युवकांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

02 Dec 2023 14:58:40
 
namo-maharojgar-melava-employment-opportunity-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सह रोजगार देखील सध्याच्या काळाची गरज बनली आहे. अनेक बेरोजगार युवक चांगल्या नोकरीच्या शोधात फिरत आहेत अशा युवकांसाठी नागपुरात होऊ घातलेल्या नमो महा रोजगार मिळावा येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 9 आणि 10 डिसेंबर रोजी जमनालाल बजाज भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अमरावती रोड नागपूर येथे भव्य नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
 
या रोजगार मेळाव्यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त कुशल-अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक, अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. तसेच किमान दहावी, बारावी पास-नापास तसेच पदविका, पदवी-पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 
या मेळाव्यात कोणत्या कंपनीत आणि किती पदांसाठी भरती करायची आहे, त्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय ? याची माहिती दिली जाईल. तरुण-तरुणींच्या बायोडेटांची छाननी करुन मुलाखतीनंतर निवड केली जाईल.
 
अशी करा नोंदणी
 
या मेळाव्यासाठी इच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर सुरू झालेली आहे. यासाठी जास्तीत जास्त उमेदवाराने सहभागी व्हावे व वाढत्या गुंतवणुकीमूळे कुशल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजेसह रोजगारच्या संधीमध्ये होणाऱ्या वाढीचा व निर्माण झालेल्या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.
 
हे एक अनोखे व्यासपीठ राहणार की जिथे दोन दिवसात जवळपास 50 हजार तरुणांची उपस्थिती अपेक्षित आहे. आयोजित मेळाव्यास जास्तीतजास्त उमेदवार व उद्योजकानी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. हा मेळावा नोकरी इच्छूक उमेदवार व उद्योजक, नियोक्तेंना नोकरी मिळवून देण्याकरीता अत्यंत आवश्यक माध्यम ठरेल अशी अपेक्षा आहे.
 
तसेच रोजगार मेळाव्यासोबतच कौशल्य,‍ विकास प्रशिक्षणांच्या संधी, स्टार्टअप परिसंस्थेबाबची माहीती, रोजगार, स्वयंरोजगार योजनांच्या माहितीची दालने देखील उमेदवारांकरीता उपलब्ध असणार आहे.
Powered By Sangraha 9.0