(image source: internet)
मुंबई:
बॉलीवूड अभिनेत्री काजोलची आई आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जीला रविवारी रात्री रुग्न्यालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ८० व्या वर्षातही नेहमी स्वस्थ आणि तंदुरुस्त दिसत असलेल्या जेष्ठ अभिनेत्री तनुजाची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगितले जात आहे. काजोलच्या आईला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांचे उचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे अभिनेत्रीला काही समस्या उध्दभवल्या ज्यानंतर अभिनेत्रीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना चिकित्सकांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.
जेष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जीने ७०-८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिली आहेत. केवळ हिंदीच नव्हे तर बंगाली चित्रपटांमधे देखील अभिनेत्री तनुजाने आपल्या अभिनयाने भरपूर नाव कमावले. जेष्ठ अभिनेत्री तनुजा बरोबरच त्यांच्या मुलींनी देखील चित्रपटसृष्टीत भरपूर यश आणि नाव मिळवले. अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री तनीशा मुखर्जी या दोघी बहिणी असून अभिनेत्री तनुजाच्या मुली आहेत. बऱ्याच लोकांना माहित नसेल, परंतु जेष्ठ अभिनेत्री नूतन आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा या सख्या बहिणी असून दोघीनींही आपल्या काळात दमदार अभिनयाने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे.