जवाहरलाल नेहरू विद्यार्थिनींची स्पोर्ट डान्स स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड

    15-Dec-2023
Total Views |
 
jawaharlal-nehru-vidyalaya-dance-competition-maharashtra - Abhijeet Bharat
 
वाडी: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या सौजन्याने गोंदिया येथे आयोजित विभागीय स्पोर्ट डान्स स्पर्धेमध्ये वाडीतील जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी मीनल मिर्चे , प्रियंका अजित स्पोर्ट डान्स स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर उत्कृष्ट नृत्य सादर करीत प्रथम क्रमांक पटकाविला. युगल बॅटल या प्रकारात उत्कृष्ट नृत्य सादर केले . पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स स्पर्धेसाठी या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
 
क्रीडा शिक्षक टेकाडे व शिक्षक पंकज मानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कौशल्य सादर केले गोंदिया येथील क्रीडा अधिकारी क्रीडा मरसकोल्हे , सहारे नागपूर स्पोर्ट डान्सचे सचिव उमेश चौरे यांनी सुद्धा विद्यार्थिनीचे कौतुक केले राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षिका प्रा. निर्मला टेकाडे, प्रणय भुयार यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.संस्थेचे सचिव युवराज चालखोर,मुख्याध्यापक सचिन डेहनकर, डॉ. वर्षा घारपुरे, उषा पांगुळ , प्रा.पंकज पाटील , प्रा.दिनेश निघुट, प्रा.अमित गायधने , प्रा.ज्योती मानकर, निर्मला टेकाडे, शुभांगी काळे ,प्रिती रामटेके, वृषाली कोकाटे, शुभम सहारे,शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद भोंगाडे व केसरी राऊत यांनी अभिनंदन केले.