ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

11 Dec 2023 18:13:15
  • आदर्श हायस्कूल समोरील घटना
  • शाळेसमोर गतिरोधक बसवण्याची मागणी
truck-accident-claims-life-near-adarsh-high-school-daryapur - Abhijeet Bharat 
दर्यापूर : शिक्षिका असलेल्या मुलीला शाळेत सोडून घरी परत जाताना आदर्श हायस्कूल समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. शरद विश्वासराव भांडे (५५. रा. साई नगर, दर्यापूर) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते एम. एच. १४ सी. बी. १७३१ क्रमांकाच्या दुचाकीने शिक्षिका असलेल्या मुलीला शाळेत सोडून घरी परत जात असतांना आदर्श हायस्कूल जवळ ट्रक क्र. एम.एच.३० ए.व्ही. ०७९७ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शरद भांडे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहित मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, घटनेचा पंचनामा करून दर्यापूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. मृतकावर उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले.
 
शाळेसमोर गतिरोधक बसवण्याची मागणी
 
ट्रक व दुचाकी अपघाताच्या घटनास्थळासमोर आदर्श हायस्कूल, आदर्श प्राथमिक शाळा व रत्नाबाई हायस्कूल अश्या तीन शाळा आहे. याठिकाणी शाळा सुटल्यावर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता दोन्ही शाळांसमोर गतिरोधक बसवण्यात यावे. शाळा सुटल्यावर रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहतुकीची ची समस्या सुद्धा उद्भवत असल्याने या ठिकाणी दोन वाहतूक पोलीस देण्यात यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0