यामी गौतमच्या 'बाला' चित्रपटाला ४ वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद!

    08-Nov-2023
Total Views |
 
yami-gautam-celebrates-4th-anniversary-of-bala - Abhijeet Bharat
 
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसाठी 'बाला' हा चित्रपट खूप खास आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आज 8 नोव्हेंबर रोजी 'बाला' चित्रपट प्रदर्शित होऊन 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटात काम करण्याचा यामी गौतमचा अनुभव सांगताना तिने हा तिच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा चित्रपट का आहे, हे सांगितले. या चित्रपटात, यामीने तिच्या परी मिश्रा या व्यक्तिरेखेला न्याय देत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
 
'बाला' चित्रपटाच्या यशाबद्दल आणि त्याच्या चौथ्या वर्धापन दिनाविषयी भावना व्यक्त करताना यामी गौतम म्हणाली, बाला रिलीज होऊन ४ वर्षे झाली आहेत आणि चित्रपटाला मिळालेल्या अभतपूर्व प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. एकूणच 2019 हे वर्ष खूप चांगले होते. 'उरी' सारख्या शौर्यपटापासून 'बाला'सारख्या विनोदीपटापर्यंत त्या एका वर्षात हे सर्व करणे निःसंशयपणे खूपच रोमांचक होते. दोन्ही चित्रपट केवळ यशस्वीच नव्हते तर उत्तम होते.
 
यामी पुढे म्हणाली की, या अद्भुत प्रवासाबद्दल मी खूप आभारी आहे आणि मला आशा आहे की मी चांगले आणि उत्तम काम करत राहीन जे प्रेक्षकांना आवडेल. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
 
यामी गौतमचे तिच्या कलेबद्दलचे समर्पण आणि बालाचे यश हे अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहे. 'बाला' आणि उरी: ए सर्जिकल स्ट्राइक'च्या यशानंतर अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत नवनवीन उंची गाठली आणि 'ए थर्सडे', 'लॉस्ट', 'दसवी' सारख्या चित्रपटांसह 'चोर निकल के भागा' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'OMG 2' पर्यंत बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर दिले आहेत.
 
उत्तम आशयघन चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली यामी आगामी चित्रपट 'धूम धाम' मध्ये प्रतीक गांधीसोबत दिसणार आहे. सध्या ती एका नवीन प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे.