11 दिवसात लावली 28 हजार महिलांच्या हातावर मेहंदी

08 Nov 2023 12:55:22
  • शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साहात समारोप
nagpur-navratri-mehandi-celebrations - Abhijeet Bharat
 
नागपूर : शहरात 11 दिवस चाललेल्या आदिशक्तीच्या जागराचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगळवारी उत्साहात समारोप झाला. या 11 दिवसांमध्ये शहरातील 306 ठिकाणी मेहंदी कलाकारांनी 28,400 महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटली.
 
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती व परंपरांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सण व उत्सवांना ‘सांस्कृतिक रुप’ देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये 306 स्थळांवरील शारदोत्सव मंडळांमध्ये 450 मेहंदी कलाकारानी गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या नेतृत्वात या उपक्रमात सहभागी होत महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटली. या उपक्रमामुळे या कलाकारांना प्रोत्साहन तर मिळालेच शिवाय रोजगारही मिळाला. उपक्रम संयोजिका मनिषा काशीकर यांचे त्यांना मार्गदर्शनात लाभले.
 
हा उपक्रम 11 दिवस अतिशय उत्साह आणि आनंदात पार पडला. चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान कांचनताई गडकरी यांनी काही ठिकाणी भेट देऊन भारतीय संस्कृतीचे महत्व पटवून दिले, असे या कार्यक्रमाच्या संयोजिका मनिषा काशीकर यांनी सांगितले. त्यांनी या उपक्रमाबद्दल नितीनजी गडकरी यांचे आभार मानले. त्याच प्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा कोठे, वर्षा ठाकरे, रेखा निमजे, ज्योती देवघरे, वर्षा चौधरी,कविता सरदार, निशा भोयर, सरिता माने,सर्व वार्ड अध्यक्ष, मंदिर परिसरातील येणार्‍या महिला, सर्व नगरसेविका, भाजपचे सर्व पदाधिकारी, सर्व निरीक्षक यांचे मनापासून आभार व अभिनंदन केले आहे.
 
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडेय, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0