महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

08 Nov 2023 17:37:44

maharashtra-state-wakf-board-inauguration - Abhijeet Bharat 
मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा, खासदार इम्तियाज जलील,फौजिया खान, आमदार अबु आजमी, आमदार फारूख शाह, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाची पाहणी केली.
 
अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयामुळे परिसरातील अल्पसंख्यांक नागरिकांची कामे अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0