राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास १० दिवसांची मुदतवाढ

    07-Nov-2023
Total Views |
  • हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या मागणीची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दखल
  • गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार
state-drama-competition-maharashtra - Abhijeet Bharat
 
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.
 
हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग नाट्य या स्पर्धांसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2023 होती. मात्र काही संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करून मंत्री मुनगंटीवार यांनी १० दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा केल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
 
राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग नाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या संघांनी ऑनलाइन पद्धतीने 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.