चित्र रंगवा स्‍पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रत‍िसाद

    06-Nov-2023
Total Views |
 
student-achievement-art-competition-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर, पम्की विथ कलर, पम्की स्किन केअर ॲण्ड किड्स कॉस्मेटिक या कंपनीतर्फे घेण्‍यात आलेल्‍या चित्र रंगवा स्‍पर्धेला विद्यार्थ्‍यांचा उत्तम प्रत‍िसाद लाभला. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेच्या कै. सुंदराबाई साने सभागृहात पार पडलेल्‍या या स्‍पर्धेत प्री-प्रायमरी गटात डी. पी. एस स्‍कूलच्‍या अद्वैत लाखेने प्रथम, ब्लूमिंग किड्स स्कूलच्‍या ऋत्विक ठाकरेचा द्वितीय तर बालव‍िहारच्‍या हर्षिता लारोकरचा तृतीय क्रमांक आला. प्रायमरी गटात जान्हवी गौरकर हिंदू गर्ल्स हायस्कूल प्रथम, हिंदू गर्ल्स हायस्कूलची सान्वी वडेकर द्वितीय तर हिंदू गर्ल्स हायस्कूलची इशिका कोलतेने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात सेवन पे स्कूलची अवनी तामने ने प्रथम, उमिया शंकर स्कूलचा चैतन्य बोकडे द्वितीय तर हिंदू गर्ल्स हायस्कूलची श्रेया पौनीकरने तृतीय क्रमांक पटकावला.
 
उच्च माध्यमिक गटात हिंदू मुलींची शाळाची मधुरा नक्षणे प्रथम, नेहा गौरकर द्वितिय तर श्रेया लांजे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेतांना पंम्‍कीतर्फे बक्षीस वितरीत करण्‍यात आली. यावेळी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणवीस, अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, हिंदू मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा डोमके यांची उपस्थिती होती.