- सविता नागोसे यांची सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून निवड
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील सुमारे ३५७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी रविवारी मतदान झाले. यामध्ये ११८६ सदस्य आणि ६८८२ उमेदवार रिंगणात होते. त्याचे निकाल आज समोर आले आहे. काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या मूळ गावी काचुरवाही येथे समर्पित पॅनलने एक हाती सत्ता काबीज करत विजय मिळवला. सविता नागोसे या सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असून 12 पैकी 12 सदस्य विजयी झाले आहेत. यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांच्या घरी गुलालाचा धुराळा उडवत बँड बाजासह जल्लोष करून हा विजय साजरा करण्यात आला. आमदार आशिष जयस्वाल यांनीही निवडून आलेले उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. निकाल लागताच विजयी उमेदवार मिरवणूक काढत आशिष जयस्वाल यांच्या घरी पोहोचले.