नागपूर :
रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथने (rotary club of nagpur south) देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील सीमांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना दिवाळीनिमित्त फराळ आणि मिठाई पाठवण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प नुकताच राबवला. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक समारंभात भारतीय लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात (उमंग) उपक्षेत्राचे जीओसी-इन-सी मेजर जनरल संजय कुमार विद्याथी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जनरल विद्यार्थी यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लब ऑफ नागपूर साउथच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पूर्व आणि उत्तर सेक्टरमधील 25 फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या जवानांना हे स्नॅक्स आणि मिठाईचे 1000 बॉक्स पाठवण्यात येतील, अे ते म्हणाले. क्लबचे अध्यक्ष डॉ.उदय गुप्ते, सचिव दीपक सोनवणे, माजी अध्यक्ष हेमंत शहा व संजय तत्ववादी आदींच्या नेतृत्वाखाली रोटेरियन्सने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
क्लबने रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या गव्हर्नर श्रीमती एस. आशा वेणुगोपाल यांनी या आणि क्लबच्या इतर प्रकल्पांबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाला रोटेरियन व इतर निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.