विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचा द्विदिवसीय तपपूर्ती सोहळा 2 डिसेंबरपासून

30 Nov 2023 13:37:34
  • धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांचे व्याख्यान व विविध कार्यक्रम
vishnudas-maharaj-spiritual-event - Abhijeet Bharat     
नागपूर : अयोध्या नगर येथील प.पू. विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचा तपपूर्ती सोहळा शनिवार, 2 व रविवार, 3 डिसेंबर असा दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा धर्मभास्कर प.पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या केंद्राद्वारे होणार्‍या या तपपूर्ती सोहळ्यात शनिवार, 2 रोजी सायंकाळी सद्गुरुदास महाराज यांचे ‘आधुनिक युगात शिवचरित्राचे महत्त्व’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजिले आहे.
 
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांची उपस्थिती राहणार आहे. रविवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता उपासना, 9 वाजता सद्गुरुदास महाराजांचे आगमन, त्यांची पाद्यपूजा, तुला आदी कार्यक्रमांबरोबरच इंगळे काकू यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार होणार आहे. यानंतर महाराजांचे आशीर्वचन व महाप्रसाद होईल. कार्यक्रमाची सांगता सद्गुरू स्तवनाने होईल. भाविकांनी या तपपूर्ती सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अयोध्या नगर उपासना केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0