वाढील मालमत्ता करा संदर्भात सर्वपक्षीय आक्रोश; नगर परिषदेवर काढला मोर्चा

03 Nov 2023 18:11:46
 
property-tax-hike-protest-anjangaon-surji - Abhijeet Bharat
 
अंजनगाव सुर्जी : नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून शहरातील सर्व मालमत्तांचे स्थळ निरीक्षण केले. त्यानंतर करण्यात आलेली मालमत्ता कर आकारणी ही अव्वाच्या सव्वा लावण्यात आली. ज्यामूळे गरीब, कष्टकरी, शेतमजूर जनतेला ती मान्य नाही. त्यामूळे तातडीने करवाढ कमी करण्याची मागणी करत नगर परिषदेवर सर्वपक्षीय अक्रोश मोर्चा काढण्यात आला. नियमाने मालमत्ता कर वाढ ही १० टक्के असते. परंतु अंजनगाव सुर्जी नगर परिषदेने सन २३-२४ मध्ये अन्यायकारण मालमत्ता कर वाढ केली. जी विद्यमान कराच्या चौपट आहे.
 
नागरिक ज्या सुविधांचा कर भरत आहे, त्या सोयी-सुविधासूध्दा नागरिकांना पुर्ण मिळत नाही. वाढविलेली करवाढ ही नागरिकांना मान्य नसून त्याबाबत शहरात सर्वत्र नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक त्रुट्या या कर आकारणी प्रणालीमध्ये आहे, ज्या निवेदनामार्फत मुख्यधिका:यांना लक्षात आणून दिल्या. हे निवेदन देतेवेळी मानवाधिकार सहायता संघाचे तालुका अध्यक्ष महेन्द्र भगत, सुनिल माकोडे, पंकज हिरुळकर, सचिन इंगळे, घरकुल संघर्ष समितीचे सचिन गावंडे, शंकर मालठाणे, सचिन जायदे, भाजपा चे माजी आमदार रमेश बुंदीले, माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, विलास कविटकर, अॅड. पद्माकर सांगोले, संजय नाठे, मनोहर मुरकुटे, गणेश पिंगे, उमेश भोंडे, अजय पसारी, मनीष मेन, विक्रम पाठक, लेंढे, प्रियांका मालठाणे, शिला सगणे, मनोहर भावे, हर्षल पायाघण, सतीश वानखडे, अविनाश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदिप येवले, अफसर बेग, काँग्रेस पदाधिका:यांसह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
 
ही कर आकारणी नियमानेच करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांचे निवेदने, आक्षेप आले आहेत, ज्या नागरीकांना चुकीचे कर आकारले आहे असे वाटत असेल, ज्यांना कर जास्त आकारण्यात आला त्या सर्वांनी नगर परिषद ने दिलेल्या विहित मुदतीपर्यंत आपला आक्षेप नोंदवावा. आलेल्या आक्षेपा नुसार सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या माध्यमातून सुनावणी करून योग्य त्यावर योग्य कारवाई केली जाईल.
 
प्रशांत उरकुडे, मुख्याधिकारी, नगर परिषद अंजनगाव सुर्जी
Powered By Sangraha 9.0