दुपट्यात दगड बांधून हल्ला चढवित हत्या; दारु पिण्यास पैसे न दिल्याने झाला वाद

03 Nov 2023 18:59:18
  • परतवाड्यातील बेलखेडा येथील घटना
fatal-alcohol-dispute-leads-to-murder-in-paratwada - Abhijeet Bharat
 
अमरावती : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दुप्पट्यात दगड बांधून एका तरुणाच्या डोक्यावर मारला. त्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. मनोज उर्फ कायू श्रीराम उमरकर (30, रा. बेलखेडा, परतवाडा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात परतवाडा पोलिसांनी आरोपी राजा ठाकूर भुसूम (25, रा. बेलखेडा) याच्याविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून, त्याला अटक केली आहे.
 
माहितीनुसार, मनोज उमरकर हे सोयाबीन काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून काम करण्यासाठी बाहेरगावी गेला होता. त्यानंतर दसरा साजरा करण्यासाठी तो गावी परतला. त्यानंतर तो गावातच राहत होता. दरम्यान 30 ऑक्टोंबर रोजी गावात राहणार्या राजेश ठाकूर भुसुम याने मनोज उमरकर याला दारू पिण्यासाठी 20 रुपये मागितले. परंतू मनोजने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे राजेश भुसुम याने जवळच पडलेला दगड उचलून दुप्पट्यात बांधला आणि तो मनोजच्या डोक्यात मारला. त्यामुळे मनोज गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर राजेश भुसुमने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेच्या माहितीवरून ठाणेदार संदीप चव्हाण, एपीआय सरोदे, पीएसआय घरटे व पोलीस कर्मचारी हिवराळे, पटेल व रुपेश यांनी तातडीने घटनास्थळी गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मनोजला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतू त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी काही वेळानंतर आरोपी राजेश भुसुम याला अटक केली. त्यामुळे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सूर्या हरिराम उमरकर (35, रा. बेलखेडा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
Powered By Sangraha 9.0