अमरावती: पोलीस आयुक्तांच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) साईनगर स्थित महेशनगरातील एका घरावर धाड टाकून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर सुरु असणा:या सट्ट्याचा पर्दाफाश केला.
रविवार, 29 ऑक्टोंबर रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणात राजापेठ पोलिस ठाण्यात आरोपी जितेश रमनिकलाल आडतीया (50, रा. महेश नगर, साईनगर) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणातील मुख्य सुत्रधाराच्या शोधात अमरावती पोलिस नागपूर गेले असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.