चुरणी : आपल्या विविध मागण्यांकरिता आशा स्वयंसेविकांना तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन कामे सांगण्यात येऊ नये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या आत मोबदला एवढा बोनस देण्यात यावा. ऑक्टोबर 2018 नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही.
केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी, आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करा, आदी मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा चिखलदरा तहसील कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात चिखलदरा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात चिखलदरा तालुक्यातील आशा रुक्मिणी अथोटे, ममता सावरकर, वसंती बेलसरे, शेवंती कास्देकर, रुपाय बेलसरे, विना चव्हाण, निर्मला मोरे, प्रमिला ठवरे, ममता खडके, सशी बेलसरे, वेनु अलोकार, अस्मीता काकडे, रंजना सुरत्ने, संगिता पात्रे, संगिता सोनुने, मालती उईके, चंकद्रला कवडे इत्यादी शेकडो आशा या आंदोलनास सहभागी झाल्या होत्या.