राजुरा बाजार : अप्रमाणित व दुय्यम दर्जाच्या कृषी निविष्ठा करणाऱ्या विरुद्ध राज्य शासनाकडून नवीन कायदे विधेयक क्रं ४० ते ४४ अंमलात येणार असल्याने राज्य सरकार विरुद्ध कृषी सेवा केंद्रा संचालकानी ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यभर बंद पुकारला आहे.
तालुक्यातील २४४ प्रतिष्ठान पुढील चार दिवस दुकाने बंद राहणार असल्याचे तालुका संघटनेचे अध्यक्ष गिरीश राठी यांनी सांगितले. ऐन रबी हंगामातील पिकांच्या पेरणी हंगामात कृषी सेवा केंद्र बंद राहणार असल्याने रबी हंगामातील हरभरा, गहूची पेरणी व संत्रा, तूर, कपाशीची फवारणी होणार असल्याने चार दिवस शेतकऱ्याची गैरसोय होणार आहे. याबाबत आमदार देवेंद्र भुयार, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले.