नागपूर : नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (एनएडीटी) च्या 77 व्या बॅचच्या 100 हून अधिक आयआरएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी रामटेक येथे भेट देत तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक खजिन्याचा शोध घेतला.
सीएसी ऑलराउंडरच्या कॅम्प चेरी फार्म येथे अनेक साहसी उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. सोबतच, मनसर येथील उत्खनन स्थळाला भेट दिली. हाय रोप कोर्स (आर्टीफिशियल क्लाइंबिंग वॉल, आर्चरी, ट्रॅक्टर राइड) आणि सायकलिंगचा रोमांचकारी अनुभव त्यांनी घेतला. लाइव्ह म्युझिक, कॅम्प फायर आणि स्टार गेझिंगमध्ये ते रमले. दुसऱ्या दिवशी परिसरातील कपूर बावडी, कालिदास स्मारक, केवल नृसिंह, रुद्र नृसिंह, गड मंदिर आणि त्रिविक्रम व्ह्यूपॉईंट यांसारख्या पुरातत्त्वीय चमत्कारांना भेट दिली. त्यांनी ट्रेकिंग आणि वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद लुटला.
एडीजी (इंडक्शन) सिद्धरामप्पा कप्पट्टनवर, उप. संचालक (इंडक्शन) अभिनव मिश्रा, उप. संचालक (इंडक्शन) साई संदीप कुमार, सहसंचालक प्रदीप एस यांनी शिबिरार्थींना प्रोत्साहन दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सीएसीचे संचालक अमोल खंते, अजय गायकवाड, मनीष मख, नितीन देशभ्रतार, राहुल आनंद, ऋषी ठाकूर, सूर्यप्रकाश आणि सीएसी-ऑलराउंडरच्या साहसी प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.