Nagpur : ६२वी हौशी मराठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा उद्यापासून नागपुरात

29 Nov 2023 18:16:41
 
maharashtra-state-drama-competition-nagpur-2023 - Abhijeet Bharat
 
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील हौशी नाट्य संस्थांसाठी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. २०२३ हे वर्ष, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६२ वे वर्ष आहे. नागपुरात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पडदा गुरुवार ३० नोव्हेंबर पासून उघडणार असून यंदा सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
 
नागपुरात ३० नोव्हेंबर २०२३ ते २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ६२वी हौशी मराठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार आहे. या २२ दिवसात एक प्रमाणे एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. नाट्य रसिकांना दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकाचा एक प्रयोग बघायला मिळणार आहे. दरम्यान, या स्पर्धेची प्राथमिक फेरी २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरु झाली असून महाराष्ट्र राज्यातील विविध १९ स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नागपुरात या स्पर्धेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.
 
नागपुरातील महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा - २०२३ वेळापत्रक
 
१. गुरूवार, ३० नोव्हेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : दि फिअर फॅक्टर
संस्था : डॉ. पि. गं. दं. सामाजिक संस्था, नागपूर
२. शुक्रवार, १ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : जाता नाही जात
संस्था : ग्लोबल वेलफेअर असोसिएशन, नागपूर
३. शनिवार २ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : आवाज कुणाचा?
संस्था : हेमेंदू रंगभूमी, नागपूर
४. रविवार, ३ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : विकृती
संस्था : कृती थि. ॲ. स्पो. अ. संस्था, नागपूर
५. सोमवार, ४ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : अघात
संस्था : कलासागर, नागपूर
६. मंगळवार, ५ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : अन्-नोन फेस
संस्था : स्पोर्ट्स ॲण्ड रिक्रिएशन कलय, कोराडी, नागपूर
7. बुधवार, ६ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : अंधारडोह
संस्था : इंस्टिट्यूट ऑफ पिपल्स वेलफेअर, नागपूर
८. गुरुवार, ७ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : दृष्टी
संस्था : मध्यप्रदेश मराठी अकादमी, इंदोर
९. शुक्रवार, ८ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : विषधर
संस्था : निलशोमा बहुउद्देशीय संस्था, नागपूर
१०. शनिवार, ९ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : मित्राची गोष्ट
संस्था : रा. तु. म. ललित कला विभाग, नागपूर
११. रविवार, १० डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : द स्ट्रोक
संस्था : वत्सल क्रिएशन सांस्कृतिक मंडळ, नागपूर
१२. सोमवार, ११ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : दंतकथा
संस्था : रंगरसिया कला थिएटर बहु. संख्या, नागपूर
१३. मंगळवार, १२ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : एक होता गाढव
उर्फ अलादाद खाँ
संस्था : राष्ट्रभाषा परिवार सा. सां. संस्था, नागपूर
१४. बुधवार, १३ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : इथर
संस्था : रखुमाई सेवा मंडळ, नागपूर
१५. गुरुवार, १४ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : स्टोरी टेरर
संस्था : बहुजन रंगभूमी, नागपूर
१६. शुक्रवार, १५ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : दुसरा आईनस्टाईन
संस्था : शिल कला सागर, नागपूर
१७. शनिवार, १६ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : गावभाग नातं मुळांशी
संस्था : को. थ. पॉ. स्टेशन स्टाफ असो., कोराडी, नागपूर
१८. रविवार, १७ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : काही क्षण आयुष्याचे
संस्था : स्वानंद सांस्कृतिक मंडळ, नागपूर
१९. सोमवार, १८ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : खटका
संस्था : श्री. पिराजी बहुउद्देशीय संस्था, नागपूर
२०. मंगळवार, १९ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : स्त्री-अंत्यकथा
संस्था : तांडव क्रिएशन, नागपूर
२१. बुधवार, २० डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : जिहाद
संस्था : विश्वोदय बहु. जनकल्याण संस्था, नागपूर
२२. गुरुवार, २१ डिसेंबर सायंकाळी ७ वा.
नाटक : फॉरवर्ड
संस्था : राजाराम सिताराम दिक्षित वाचनालय, नागपूर
Powered By Sangraha 9.0