Nagpur : नागपुरात ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

29 Nov 2023 14:20:12
 
maharashtra-legislature-winter-session-nagpur - Abhijeet Bharat
 
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
 
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.
 
हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण १४ दिवस कामकाज चालणार आहे. विधिमंडळातर्फे अधिवेशनाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ४ दिवस सुट्टी आणि १० दिवसांचे कामकाज या अधिवेशनात पार पडेल.
Powered By Sangraha 9.0