- बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही
नागपूर : नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याच्या समर्पित प्रयत्नात, OCW आणि NMC ने लकडगंज झोनमधील दोन ESRs च्या स्वच्छतेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
साफसफाई चेवेळापत्रक खालीलप्रमाणे :
- गुरुवार, 30 नोव्हेंबर 2023: लकडगंज-1 ESR
- शुक्रवार, 1 डिसेंबर 2023: लकडगंज ESR-2
स्वच्छतेच्या प्रक्रियेदरम्यान खालील भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल :
लकडगंज ESR-1: जुनी मंगळवारी, भुजाडे मोहल्ला, चिचघरे मोहल्ला, स्वीपर कॉलनी, माटघरे मोहल्ला, मट्टीपुरा, हत्तीनाला, गरोबा मैदान, दिघोरीकर स्क्वेअर, कापसे स्क्वेअर, धवडे मोहल्ला, माटे स्क्वेअर, चापघरे, नागरनगर, जुगारनगर, नागरगाव बजरंग नगर, गुजर नगर, कुंभारटोली.
लकडगंज ESR-2 : सतरंजीपुरा, गंगाजमुना, रामपेठ, बुद्धपुरा, कुंभारपुरा, लकडगंज लेआउट, एव्हीजी लेआउट, सतनामी नगर, शौ मोहल्ला, भगवती नगर, छोटा कारखाना क्षेत्र, भाऊराव नगर, धनगंज स्वीपर नगर, चाकरनगर.
ही नियोजित साफसफाई पाण्याच्या गुणवत्तेची मानके राखण्यासाठी आणि उल्लेख केलेल्या भागात अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अविभाज्य आहेत. नागरिकांना विनंती आहे की, या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी परुेसा पाणीसाठा करून ठेवावा.
OCW आणि NMC नागपूरच्या नागरिकांना दर्जेदार पाणी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. या काळात NMC-OCW ने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे. पाणीपरवुठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.