Nagpur : वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधान दिवस उत्साहात संपन्न

27 Nov 2023 16:58:52
  • संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ - दिनेश बन्सोड
vanchit-bahujan-aghadi-celebrates-constitution-day-in-wadi - Abhijeet Bharat 
वाडी : भारतीय संविधान दिनानिमित्त वाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात वंचित बहुजन आघाडी तर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंचीत चे नेते माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माजी ग्रा.पं.सदस्य विश्वनाथ कुकसे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुंड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर दिलीप भोरगडे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील ग्रहण करविले. यावेळी विजय वानखडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
 
कार्यक्रमाचे आयोजक दिनेश बन्सोड यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,वर्तमान शासनकर्त्या कडून देशात विषमता पसरविण्याचे काम होत असून लोकशाही धोक्यात आली आहे. यामुळे संविधानाला धोका निर्माण झाल्याने बहुजन समाजाच्या एकजुटी ची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी इतरही मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले. याप्रसंगी संविधान दिन चिरायू होवो अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माजी ग्रा.पं.सदस्य विश्वनाथ कुकसे,सामाजिक कार्यकर्ते अनिल पुंड, बाबुराव वासनिक,राजू रंगारी,रमेश भोवते,दिलीप भोरगडे,सुरज वानखेडे,अनिल वानखडे, भगवान मेश्राम,धनपाल गजभिये,जितेंद्र पानतावणे, भिमरावजी नवाडे,प्रवीण तायडे,संजय भोरगडे, फिरोज खान पठाण, सुधीर कांबळे,सचिन खोब्रागडे, गजानन बन्सोड, राजेश कावळे,मिलिंद बागडे, विनायक वानखडे,अर्जुन थोटे,ममता मडके, मंदाबाई बागडे,कांताबाई नगराळे,बिर्जूला मेश्राम,पुष्पा मेश्राम,नेहारिका पोटपोसे इत्यादी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0