मुंबई : येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर असे हे अधिवेशन राहणार असून एकूण १४ दिवस याचे कामकाज चालणार आहे. विधिमंडळातर्फे अधिवेशनाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ४ दिवस सुट्टी आणि १० दिवसांचे कामकाज या अधिवेशनात पार पडेल. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी नागपुरात येणार आहे. उद्या दुपारी १२ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल.
असा राहील उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा नागपूर दौरा:
- सकाळी ९:५५ वा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुरदर निवासस्थान, मादाम कामा रोड, नरीमन पाँईट, मुंबई येथून सांताक्रुज, मुंबई विमानतळाकडे प्रयाण
- सकाळी ११:०५ वा : मुंबई विमानतळ येथून नागपूरकडे प्रयाण
- दुपारी १२:४० वा : नागपूर विमानतळ येथे आगमन व नंतर शासकीय निवासस्थान, नागपूरकडे प्रयाण
- दुपारी १ वा : नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या समवेत दोन्ही जिल्हयातील मुलींवरील वाढते अत्याचार या संदर्भात बैठक
- दुपारी २:१० वा : शासकीय निवासस्थान, नागपूर येथून विधान भवन, नागपूरकडे प्रयाण
- दुपारी २:१५ वा : हिवाळी अधिवेशन 2023 रोजीच्या नागपूर विभागातील सर्व अधिकारी यांच्यासमवेत पूर्वतयारी आढावा बैठक
- स्थळ- मंत्री परिषद कक्ष, विधान भवन, नागपूर
- बैठक समाप्तीनंतर शासकीय निवासस्थानाकडे प्रयाण व आगमन
- दुपारी ४ वा : पत्रकार परिषद, विधानभवन नागपूर
- दुपारी ५ ते ८ वा : राखीव
- रात्री ८ वा : शासकीय निवासस्थान, नागपूर येथून नागपूर विमानतळकडे प्रयाण
- रात्री ९:२० वा : नागपूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण
- रात्री १०:५० वा : मुंबई विमानतळावर आगमन व पुरदर निवासस्थानाकडे प्रयाण
- रात्री ११:५० वा : पुरंदर निवासस्थान येथे आगमन व राखीव