नागपूर : शस्त्राचा धाक दाखवून रस्त्यावर हैदोस घालत असलेल्या गुंडाला पाचपावली पोलिसांनी अटक केली. रोहित जीवन पागोटे (24) रा. नाईक तलाव, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
शनिवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास रोहित नाईक तलाव परिसराच्या मराठा चौकात तलवारीच्या बळावर हैदोस घालत होता. या दरम्यान गस्तीवर असलेले पाचपावली पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांना पाहताच रोहितने पळ काढला. घेराबंदी करून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त करीत आर्म्स अॅक्ट आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.