Nagpur Accident : ऑटोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

27 Nov 2023 18:01:17
 
nagpur-fatal-motorcycle-auto-collision - Abhijeet Bharat
 
नागपूर : भरधाव ऑटोने दिलेल्या धडकेत एका मोटारसायकलस्वार इसमाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. संदीप भीमराव गजभिये (35) रा. प्रवेशनगर असे मृताचे नाव आहे.
 
शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास संदीप त्यांच्या एमएच-31/डीएल-7262 क्रमांकाच्या मोटारसायकलने राणी दुर्गावती चौकातून जात होते. दरम्यान एका ऑटो चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून संदीप यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली आणि फरार झाला. यात संदीप यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी संदीप यांचे भाऊ प्रदीप यांच्या तक्रारीवरून आरोपी ऑटो चालकावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0