शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का? - विजय वडेट्टीवार

27 Nov 2023 15:56:48
 
education-minister-deepak-kesarikar-controversy-vijay-wadettiwar - Abhijeet Bharat
 
मुंबई : शालेय शिक्षकमंत्री दीपक केसरकर शिक्षक भरतीवरून एका भावी महिला शिक्षकावर चांगलेच संतापल्याचे समोर आले आहे. 'शिक्षक भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. माझी येथे महत्वाची मुलाखत सुरु असताना तुम्ही थेट मला विचारायला कसे आलात? अजिबात मध्ये बोलायचे नाही, अन्यथा तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन, अशी धमकी यावेळी दीपक केसरकरांनी महिलेला दिल्याचे एका व्हिडिओत दिसून आले आहे. यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून दीपक केसरकरांना धारेवर धरत शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
 
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय.... तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय... तुमचे वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे असे म्हणत शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
 
 
नेमक प्रकरण काय?
 
शालेय शिक्षकमंत्री दीपक केसरकर रविवारी एका कार्यक्रमासाठी बीडमध्ये गेले होते. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका भावी महिला शिक्षकाने अचानक केसरकर यांना घेरून शिक्षक भरतीवरून काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शिक्षक भरतीची वाट बघून आम्ही खूप थकलो आहे दर. संकेतस्थळ सुरु झाले आहे, नोंदणी झाली आहे पण समोरची प्रक्रिया होतच नाहीये. अजून जाहिरातच आलेली नाही, मग चॉईस कशी देणार आहे? जाहिरात कधीपर्यंत येणार? आम्ही ५ वर्षांपासून जाहिरातीची वाट बघतोय, प्रक्रिया रखडलेली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करत महिलेने दीपक केसरकारांच्या मुलाखतीत अडथळा आणला.
 
यानंतर दीपक केसरकर देखील महिलेवर चांगलेच संपातले. यावेळी महिलेला उत्तर देताना ते म्हणाले, तुम्हाला अजिबात कळत नाही. शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमचे संकेतस्थळ सुरु झाले आहे. तुम्ही तिथे गेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितली आहे. आणि तुम्ही म्हणता जाहिरात आली नाही. ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरीवर येऊ शकत नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार आहे? संकेतस्थळ सुरु झालेले आहे. तुम्हाला काही वाटत नाही का? मग तुम्ही कसे आला मला विचारायला? संकेतस्थळ सुरु झाले आहे. भरती चालू आहे. तर एक लक्षात घ्या की, श्रद्धा आणि सबुरी. आजपर्यंत ५ वर्षात कोणी तुमची भरती केली का? मी केली. मग यावेळी माझी एक महत्वाची मुलाखत सुरु असताना त्यामध्ये तुम्ही येत आणि एवढं बेशिस्त वर्तन करता. या मुलाखतीनंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही? मी जेवढा प्रेमळ आहे, तितकाच मी कडक सुद्धा आहे, असे दीपक केसरकर यांनी सुनावले.
 
माझ्या दृष्टींनी माझे विद्यार्थी महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला ३० हजार नोकऱ्या मी उपलब्ध करून दिल्या आहेत. पण उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल, तर ते मला अजिबात मान्य नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजे. माझे अधिकार म्हणेज सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणार महाराष्ट्राचा भवितव्य आहे. महाराष्ट्राचे भवितव्य हे या मुलांमध्ये आहे. ती मुले चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे. याच्यावर माझा विश्वास आहे, असे यावेळी दीपक केसरकर म्हणाले. त्यावर महिला पुन्हा मध्येच बोलली असता केसरकर म्हणाले, अजिबात मध्ये बोलायचे नाही. नाही तर मी तुमचे नाव घेऊन तुम्हाला अपात्र करायला लावेल.
Powered By Sangraha 9.0