वाडी : भाजपा वाडी मंडळ व वाडी शहर तर्फे शिख पंथाचे संस्थापक गुरु नानकदेवजी यांची जयंती साजरी करण्यात आली. गुरु नानकदेवजी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा वाडी मंडळ अध्यक्ष आनंदबाबु कदम, वाडी शहर अध्यक्ष कैलाश मंथापुरवार, अभिजीत जोशी,मानसिंह ठाकुर, प्रकाश डवरे, ईशांत राऊत, राजेश जिरापुरे उपस्थित होते.